छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुकी संदर्भात आज माननीय पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शांती सभेचे आयोजन पोलीस समुदाय भवन करण्यात आले होते.
यावेळी या सभेत शिवजयंती चित्ररथ मिरवणूक की संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य उपाययोजना राबविण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या .यावेळी आयुक्तांनी पोलिसांची चारही बाजूने करडी नजर असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. मिरवणुकीचा चारही बाजूने पोलीस बंदोबस्त करण्यात येणार असून वरून ड्रोनची नजर असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच मिरवणूक काळात डॉल्बीच्या ध्वनी वर नियंत्रण ठेवावे डॉल्बी ही आपली हिंदू संस्कृती नाही त्यामुळे पारंपारिक ढोल-ताशाच्या वाद्यात मिरवणूक शांततेत पार पाडावी तसेच मिरवणुकीत युवक करत असलेल्या हुल्लडबाजी ला थारा देऊ नये अशी सूचना यावेळी आयुक्तांनी केली
यावेळी पोलिस आयुक्त डॉक्टर एम बी बोरलिंगय्या पोलीस उपायुक्त क्राईम पी व्ही स्नेहा पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी, खडे बाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी हवालदार कर्मचारी या आयोजित केलेल्या शांती सभेस उपस्थित होते.