ठेकेदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी उडपी पोलिस बेळगावात दाखल झाले आहे यापूर्वी त्यांनी हिंडलगा ग्रामपंचायतीची कसून चौकशी केली होती तसेच गावकऱ्यांना देखील ए संतोष बद्दल विचारपूस करून काही माहिती मिळवली होती.
हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी हिंडलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांचा मोबाईल जप्त केला असून याबाबत अधिक तपास चालविला आहे.
तर आता नागेश मन्नोळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पोलिसांनी अधिक तपास चालविला आहे याठिकाणी संतोष यांच्याबद्दल नागेश त्यांच्याकडे काही धागेदोरे सापडले यांनी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.