गेल्या महिन्यात वादळी पावसाने शहरात बऱ्याच वाहनांचे नुकसान झाले होते. येथील आंबेडकर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोर जुनाट झाड उन्मळून पडल्याने जवळपास 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाले. यात काळी अमराई येथील रहिवासी असलेल्या विजय कोल्हापुरे यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यामुळे त्यांना सरकार कडून नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून पाच लाख रुपयांचा धनादेश आमदार अनिल बेनके यांनी त्यांची पत्नी रेणुका विजय कोल्हापुरे यांच्याकडे सुपूर्द केला.
शहरामध्ये गेल्या 19 एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पाऊस पाणी वादळी वाऱ्यामुळे विजय कोल्हापुरे यांच्या अंगावर झाड पडले होते.यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात करिता सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून त्यांना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी त्यांना वैयक्तिक क्षमतेनुसार मदत करण्याचे आश्वासनही दिले.