रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत जिव्हाळा फॉउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक थलसमिया दिनाच्या पार्श्ववभूमीवर सदर शिबीर पार पडले.
यावेळी रुग्णांचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जायंट्स परिवाराच्या सदस्यांनीही रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला. सदर शिबिर महावीर ब्लड बँक रेडिओ कॉम्प्लेक्स येथे पार पडले.
यावेळी महावीर ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर यलबुर्गी यांनी रक्तदान विषयी महत्व सांगितले. तसेच रक्तदान का केले पाहिजे. त्यामुळे काय होते रुग्णाचा जीव वाचविण्या बरोबरच स्वतःच्या शरीरात ही नव्याने रक्त तयार होते. आपण नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहतो असे सांगितले.
यावेळी रक्तदान शिबिराची जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू डॉक्टर सुरेखा पोटे सेक्रेटरी संजीवनी पाटील राजश्री अंगोळकर सुहास हुद्दार माधुरी वीर, मीनल पाटील मनाली पोटे जायंट्स फेडरेशनचे अध्यक्ष दिनकर अमिन राजू माळवदे श्रीधर पाटील गणेश हुडाप विजय खोत यांच्यासह आदी उपस्थित होते.