परिवहन मंडळाने नवीन बसेस खरेदी करण्यासाठी 931 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या कमी असल्याने प्रवासी वाहतुकीमध्ये अडचण निर्माण होत असल्याने परिवहन ने ही मागणी केली असून 2800 नवीन बस खरेदी करण्याकरिता निधी मंजूर करून द्यावा आणि वाहतुकीवरील ताण मोकळा करावा अशी मागणी केली आहे.
परिवहन कडे बस चा अभाव असल्याने प्रवासी वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे त्यामुळे नव्या बस खरेदी करण्याकरिता शासनाने निधी लवकरात लवकर मंजूर करावा. तसेच शासनाने 2800 नवीन बस द्याव्यात त्यापैकी पंधराशे बसेस के एस आर टी सी आणि तेराशे बसेस डब्ल्यू के एस आर टी सी ला देण्याची मागणी केली आहे.
सध्या 9.3 लाख किलोमीटरचा प्रवास केलेल्या जुन्या बसेस वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहेत आयुष्यमान संपलेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत तसेच बसमुळे प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असल्याने लवकरात लवकर परिवहन ला नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.