2017 पासून आतापर्यंत ऑडिट रिपोर्ट सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक स्वराज्य पार्टी या बेळगाव जिल्ह्यातील राजकीय पक्षाला नोटीस बजाविली आहे.
सदर पक्षाने पाच वर्षाचा ऑडिट रिपोर्ट सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. यासंबंधी नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एक परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
कर्नाटक स्वराज्य पार्टीचे कार्यालय साईनगर रायबाग किती आहे मात्र सदर पक्षाने गेल्या पाच वर्षात कोणताही ऑडिट रिपोर्ट सादर न केल्याने रायबाग तहसीलदारांमार्फत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
सदर पक्षांनी दिलेल्या पत्त्यावर सध्या कोणीच राहत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी किंवा अन्य सदस्यांनी लवकरात लवकर ऑडिट रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सादर करावा असे आदेश बजावले आहेत.