शहरात आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कोणी मानसिक अस्वस्थतेतून आत्महत्या करत आहे तर कोणी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे.
आता शिवबसव नगर येथील एका ट्रक चालकाने देखील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे उघडकीस आले आहे. निजलिंगप्पा बी वय 51 राहणार अनमोड जिल्हा दावणगिरी व सध्या राहणार शिवबसव नगर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की घरात कोणी नसताना निजलिंगप्पा यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच मारुती पोलीस स्थानकाची पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी उत्तरीय तपासणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह पुढील तपासासाठी सिव्हिल हॉस्पिटल मधील शवागृहात पाठविला. मात्र निजलिंगप्पा याने आत्महत्या का केली याचे कारण अध्यायात समजू शकले नाही.