उद्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
करण्यात येणार आहे . शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सकाळी 6:30 वाजता येथील छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे साजरा करण्यात येतो.
त्यामुळे उद्या सर्व शिवभक्तांनी सकाळी 6:30 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आली आहे.तसेच यावेळी भगवे फेटे बांधून शिवभक्तांनी पारंपारिक वेशात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवाजी उद्यापासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत चालत जाऊन कपिलनाथाचे दर्शन घेतले जाणार आहे असे कळविण्यात आले आहे.