रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत गणेशपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एम आय एम बेळगाव शाखा गिजरे प्राईम केअर हॉस्पिटल गणेशपुर आणि महावीर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबीर पार पडणार आहे.
सदर रक्तदान शिबीर 24 जून रोजी गिजरे प्राईम केअर हॉस्पिटल अयोध्या नगर गणेशपुर येथे पार पडणार असून सकाळी 9.30 ते 1.30 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावे तसेच नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजित केलेल्या संस्थांकडून करण्यात आले आहे.