कॅण्टोन्मेंट बोर्डावर कॅन्टोन्मेंट बोर्ड सध्या प्रशासकीय राजवट आहे. ब्रिगेडियर जॉयदीप BELAGAVI मुखर्जी आल्यापासून केवळ तीनच बैठका झाल्या आहेत. यापूर्वी महिन्याला एक प्रमाणे मासिक बैठक होत होती. मात्र आता सरकार नियुक्त सदस्य असूनही नियमित बैठका होणे बंद झाले आहे.
लोकनियुक्त सदस्य असताना कॅण्टोन्मेंट बोर्डाची प्रत्येक महिन्याला एक बैठक वेळेवर होत होती. मात्र गेल्या सहा महिन्यांत फक्त तीनच मासिक बैठका झाल्या आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांत एकच बैठक झाली आहे.
बैठकविना बोर्डातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे बोर्डातील नागरिकांत नाराजी दिसून येत आहे. पूर्वी बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जात होती. सध्या मात्र हद्दीतील महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्यासाठी बैठकच होत नसल्याने विविध प्रश्न प्रलंबित आहेत. बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी याकडे लक्ष द्यावेव वेळेवर मासिक बैठकी घ्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहेत.
कॅण्टोन्मेंट बोर्डाची मासिक बैठक झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती दिली जाते. सहा महिन्यांच्या कालावधीत ३१ जानेवारीला बैठक झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली नाही. ८ मार्चला बैठक झालीमात्र एप्रिल महिन्यात बैठक झालीनाही. १० मे ला बैठक झाल्यानंतर अद्याप बैठक झाली नाही. गेल्या दीड वर्षांपासून बोर्डावर लोकनियुक्त सदस्य नाहीत. त्यामुळे नियमित मासिक बैठका होताना दिसत नाहीत