विश्व मानव एक्सप्रेसच्या वेळात बदल करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रकानुसार दिनांक 5 ऑगस्ट पासून सदर रेल्वे आपल्या निश्चित मार्गावर धावणार आहे.
नैऋत्य रेल्वेने या विश्व मानव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असून नवीन वेळापत्रकानुसार सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी सदर एक्सप्रेस हुबळी बेळगाव स्थानकात दाखल होणार आहे.तसेच सायंकाळी 6. 13 मिनिटांनी धारवाड तसेच 6. 34 मिनिटांनी मुगड 7. 01 मिनिटांनी आळणावर 7. 14 मिनिटांनी तावरकट्टी 7:50 लोंढा रात्री8. 19 खानापूर 9.25 त्यानंतर बेळगाव ला पोहोचणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार नैऋत्य रेल्वेने हुबळी ते बेळगाव या दरम्यानच्या वेळापत्रकात बदल केला असून याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.