काकती येथील स्मशानभूमी मध्ये जवळपास 30 हून अधिक झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी सदर वृक्षारोपण डिझाईन हेल्पिंग हॅन्ड ग्रुप च्या वतीने करण्यात आले. यावेळी त्यांनी सांसे हो रही है कम आओ पेड लगाई हम हा संदेश दिला.
यावेळी पर्यावरणाच्या रक्षणाकरिता झाडे लावणे किती महत्त्वाचे आहे तसेच त्याचे संगोपन करणे काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना महामारी मध्ये अनेकांना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला.जर आपल्या आसपास शुद्ध वातावरणात श्वासोच्छोत्सवास करण्यात आले तर आपले आरोग्य तंदुरुस्त व निरोगी राहील त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन केले पाहिजे असे सांगण्यात आले
यावेळी येथील स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. याप्रसंगी समाजसेवक विनायक केसरकर वनविभागाचे आरण्यरक्षक संजय गव्हाणे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष वर्षा मुचंडीकर सुनिता गव्हाणे यांच्यासह काकती भागातील नागरिक वृक्षारोपणा कार्यक्रमात सहभागी झाले होते.