गेल्या तीन दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती आयोध्या नगर येथील पॅन्टलुम्स या शोरूम च्या मागे पडून होता त्यामुळे या ठिकाणी असलेले रहिवाशांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी त्या व्यक्तीला मदतीचा हात देऊ केला.
वैशाली चौगुले यांनी सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर सुरेंद्र अनगोळकर यांनी तातडीने हेल्प फॉर नीडी या प्रभागातील सागर मुद्दिनमनी यांना आयोध्या नगर येथे रुग्णवाहिका घेऊन पाठविले.
त्यानंतर त्या व्यक्तीला नारळ पाणी देऊन पुढील उपचाराकरिता सरकारी रुग्णालयात दाखल केले. नागरिकांच्या एका हाकेला धाव देणाऱ्या सुरेंद्र अन गोळकर यांचे अयोध्यानगर येथील नागरिकांनी आभार मानले.