यळेबैल सुरुते संपर्क रस्ता सुरुते ग्राम पंचायत कडून श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आला. चार वर्षाच्या मागील अतिवृष्टीमुळे यळबैल सुरुते संपर्क रस्ता
खराब झाला होता. तसेच रस्ताला मोठ-मोठी भगदाड पडले होते . यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण बनले होते.
त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन ग्रामपंचायत कडून श्रमदानातून येथील खड्डे बुजविण्यात आले. आणि रस्ता सुस्थितीत करण्यात आला.
येथील मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात घडत होते.त्याचबरोबर या गावातील बस सेवा देखील तीन-चार वर्षे बंद झाली होती. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर विद्यार्थ्यांना पायी चालून प्रवास करावा लागत होता.
या संदर्भात रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदन लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्यापही येथील रस्त्याची कोणत्याही प्रकारे दुरुस्ती झाली नसल्याचे पाहायला मिळत होते त्यामुळे येथील समस्या जाणून घेऊन सुरुते पंच कमिटी यांच्याकडून माती टाकून खड्डे बुजवण्यात आले.