सीमा सत्याग्रही शटूप्पा हिरामणी कदम यांचे निधन
बाळगमट्टी येथील रहिवासी सीमा सत्याग्रही शटूप्पा हिरामणी कदम(वय 96) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांनी सराबंदीच्या आंदोलनात सत्याग्रह केला होता .त्यात त्यांना तीन महिने बल्लारी तर एक महिना हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होत. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले ,दोन मुली ,नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.अंत्यविधी उद्या दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा होणार आहे.