हलगा गावच्या बस्ती जवळ आज सायंकाळी 4:30 -4:45 वाजण्याच्या सुमारास भररस्त्यात अज्ञातांनी एका व्यक्तीच्या मानेवर प्राणघातक वार करून खून केला आहे .या घटनेत गद्गय्गया हिरेमठ वय 40 असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
या घटनेत त्या व्यक्तीची मान तुटून खाली पडल्याने तो मोटरसायकलवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून गतप्राण झाला. सदर प्रकारामुळे हलगा – तारीहाळ रस्त्यावर घबराट पसरली होती. यावेळी घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंनूर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.