बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीकडे जिल्हा प्रभारी मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अतिवृष्टीमुळे नागरीकांचे हाल होत असले तरी त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत मंत्री गोविंदा कारजोळ यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी गोकाकच्या हिल गार्डन कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीगहोळी म्हणाले की, गेल्या अतिवृष्टीनंतरही सरकार किंवा मंत्र्यांनी या पुराला प्रतिसाद दिला नाही. यंदाही तोच निष्काळजीपणा कायम आहे.पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काहींना हलवण्यात आले तर काहींना असेच सोडण्यात आले आहे , असा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर ते म्हणाले की यमकनमर्डीत मला टार्गेट करून काही फायदा नाही. नागरीकांचा पाठिंबा आपल्या बाजूने असताना भाजप काय करू शकत नाही. भाजप सत्तेसाठी वेगळ्या वाटेने जात आहे, मुख्यमंत्र्यांच्या भडक भाषणाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला आमच्या नेत्यांनी आधीच उत्तर दिले आहे असे ते म्हणाले .त्यानंतर त्यांनी भाजपच्या जनस्पंद कार्यक्रमात अठरा जणांचा समावेश नाही. असे सांगून खिल्ली उडवली आणि सांगितले रिकाम्या खुर्च्या असल्याचे आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहिले आहे.
परीक्षेतील गैरप्रकारप्रकरणी केपीटीसीएलने यापूर्वी २० जणांना अटक केली आहे. केवळ अटक करून उपयोग नाही. पैसे देऊन नोकरी मिळण्याची स्थिती निर्माण झाली तर शिक्षण घेतलेल्यांवर अन्याय होईल. कारण दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी. अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कारवाई करावी, अशी मागणी सतीश जारकीहोळी यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर केली.