केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी घरोघरी स्वच्छ पाणी नळ योजनेची सुरुवात कोणेवाडीमध्ये करण्यात आली यावेळी बेळगाव भारतीय जनता पार्टीच्या खासदार मंगल सुरेश अंगडी यांच्या हस्ते पूजा करून या योजनेची सुरवात करण्यात आली .
याप्रसंगी खासदार मंगला सुरेश अंगडी ,भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय विलास कदम,कुद्रेमनी ग्रा,पंचायत माजी अध्यक्ष संजय पाटील यांचे स्वागत कोणेवाडीतील ग्रामपंचायत विद्यमान् सदस्य मोनाप्पा नारायण पाटील सदस्या माधुरी पाटील यांनी केले .
त्यानंतर भारतीय जनता पार्टी कोनेवाडी बूथ मेंबर सुनिता नागेन्द्र कंग्राळकर, भारतीय जनता पार्टी कोणेवाडी युवा नेते राजू कंग्राळकर,कृष्णा पाटील यांच्या हस्ते शाल व हार घालून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पूजेला उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार ,उचगाव ग्रा,प सदस्य बंटी पावशे ,तुकाराम भातकांडे,सिद्राय नंद्याळकर ,गजानन भातकांडे,राजश्री राजू कंग्राळकर,कमल किटवाडकर,यल्लूबाई पाटील इतर कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.