सीमाभागा संदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक काळात पुन्हा वाद निर्माण झाला आहे .त्यामुळे अनेक संघटनांचे कार्यकर्ते बसेसना काळे फासण्याचे प्रकार करत आहेत. महाराष्ट्रातील काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बसेस वर काळी शाई फेकुन आपला संताप व्यक्त करत आहेत.त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत
यापूर्वीही कर्नाटक आणि महाराष्ट्रात बेळगाव सीमाप्रश्ना बाबत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता या प्रकरणाला उधाण आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 300 हुन अधिक बसेस बंद करण्यात आल्या आहेत.