बेळगाव येथील मेसॉनिक हॉल कॅम्प, येथे रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंटर चा चार्टर नाइट प्रोग्रॅम पार पडला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन व्यंकटेश देशपांडे उर्फ बबन असिस्टंट गव्हर्नर संजय कुलकर्णी व गोगटे समुदायाचे मालक शिरीष गोगटे हे उपस्थित होते .कार्यक्रम फार उत्साहात पार पडला त्यामध्ये डिस्टिक गव्हर्नर वेंकटेश देशपांडे यांनी रोटरी बद्दल आपले मत व्यक्त केले .व क्लब बद्दल मार्गदर्शन केले यामध्ये असिस्टंट गव्हर्नर संजय कुलकर्णी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले .त्यावेळी गोगटे समुदायाचे मालक यांनी दोन व्हील चेअर गरजू व्यक्तींना दिली त्यावेळी त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आणि शिरीष गोगेट यांनी आपले मनोगत समाजाबद्दल मदत केली पाहिजे आणि हे रोटरी करत आली आहे त्याबद्दल त्यांनी आभार मानला त्यावेळी क्लबचे अध्यक्ष रवी हत्तरगी,सचिव अमित पाटील व इव्हेंट चेअरमन मंजुनाथ आळवणी यांनी सगळ्यांचे आभार मानले त्यावेळी क्लब व इतर क्लबचे अध्यक्ष व मेंबर्स उपस्थित होते त्यावेळी इतर क्लबच्या अध्यक्ष व मेंबर यानी क्लबचे अध्यक्षांना व चार्टर्स मेंबर्सना शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल चा चार्टर नाइट कार्यक्रम उत्साहात
By Akshata Naik

Must read
Previous articleमहाराष्ट्रातून बेळगाव मध्ये येणाऱ्या 300 बसेस तात्पुरता बंद