No menu items!
Thursday, August 28, 2025

निपाणी येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष

Must read

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

निपाणी – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे 27 नोव्हेंबर या दिवशी म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बी.पी. रोड येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, या सभेच्या प्रसारासाठी शुक्रवार, 25 नोव्हेंबर या दिवशी वाहनफेरी काढण्यात आली. या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्‍या घोषणा यांमुळे अवघे निपाणी भगवेमय झाले होते. या वेळी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, भारत मातेचा विजय असो, हिंदु एकजुटीचा विजय असो, हिंदूंनो जागे व्हा, वंदे मातरम् यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यांमुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य स्फुरल्याचे दिसून आले. फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती शिवाजी चौक येथे भाजपच्या नगरसेविका सौ. कावेरी मिरजे आणि श्री. सागर मिरजे यांच्या हस्ते हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस हार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमीचे संचालक श्री. चारुदत्त पावले, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, तर जत्राट येथील  ह.भ.प. श्रीधर महाराज यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर बेळगाव नाका, छत्रपती संभाजीराजे चौक, कित्तूर चेन्नम्मा सर्कल, महादेव मंदिरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहनफेरीची समाप्ती झाली. फेरीच्या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेस, तसेच कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. विविध चौकांमध्ये फेरीचे स्वागत करण्यात आले. फेरीच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना संबोधित करून 27 नोव्हेंबर या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, नांगनूर येथील श्री संप्रदायाचे श्री. सुरेश गुरव, निपाणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. नीता बागडे, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांनी सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदुत्वाचे स्फुल्लींग चेतवणार्‍या फेरीने निपाणीकरांचे मन जिंकले.

आपला विश्‍वासू,

श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीकरिता (संपर्क क्रमांक : 9420722632)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!