बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिज आणि हेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 300 हून अधिक ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. उद्यमबाग येथील बीसीसीआय हॉलमध्ये आज (शुक्रवार दि. 7) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध योजनांसंबंधी जागृती करण्यात आली.
हेस्कॉमच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एचटी लाइन, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसह 300 हून अधिक ग्राहकांनी अर्ज केला होता. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबधी हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रकाश आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, मानद सचिव स्वप्नील शहा, प्रभाकर नागरमुनोळी, आनंद देसाई, रोहन जावळी, सी सी होंडकट्टी उदय जोशी आणि संजय पोतदार उपस्थित होते. हेस्कॉमचे एमडी रोशनजी यांनी देखील कार्यक्रमस्थळी भेट दिली आणि बेळगावच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिले.