सर्वांसाठी समान, सर्वांना समान” हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यातील जनतेच्या हिताचा 3 लाख 28 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्यातील सर्व घटकांच्या सक्षमीकरणासाठी पूरक, आशादायी, आणि लोकाभिमुख अर्थसंकल्प असल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या 14 व्या अर्थसंकल्पात विशेषत: राज्यातील शेतकरी, महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी या अर्थसंकल्पात नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, सिंचन, उद्योग या सर्व क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 10.143 कोटी: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या 14 व्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 10.143 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच बेळगावात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसह देशातील पहिले अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी विरोधी कायदेही वगळण्यात आले.
त्याचबरोबर शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज रु. ३ लाख ते ५ लाख वाढ आणि दीर्घ मुदतीचे कर्ज रु. 10 लाख ते 15 लाख करण्यात आली आहे. कृषी भाग्य योजनेंतर्गत नरेगा योजनेसाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. 100 कोटींची तरतूद करण्यात येत आहे.सर्व क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा स्वागतार्ह अर्थसंकल्प असल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले आहे .