सौंदत्ती येथील यल्लमा देवीची यात्रा जवळ आल्याने प्रवाशांना सोयीस्कर व्हावे याकरिता मध्यवर्ती बस स्थानकावर यल्लामा डोंगराकडे जाण्यासाठी विशेष पिकअप पॉइंट सुरू करण्यात आली आहे. थेट बेळगाव ते सौंदत्ती विनाथांबा बससेवा सुरु केली असल्याने प्रवाशांना यात्रेला जाणे सोयीस्कर ठरले आहे. परिवहन मंडळाने याकरिता 50 बसेस राखून ठेवले आहेत.
सौंदत्ती रेणुका देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले झाले असल्याने डोंगरावर भाविकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे वायव्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली आहे यासाठी 50 बसेस उपलब्ध करुन दिला असून सामुहिक बस आरक्षणाची सोय ही करून दिली आहे.