जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका आणि जिल्हा परिशिष्ट कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील कुमार गंधर्व रंग मंदिर येथे आज सकाळी श्री महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्यासह जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते श्री महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा व मूर्तीचे पूजन करून जयंती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निमंत्रितांसह वाल्मिकी समाजातील नेतेमंडळींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभनंतर श्री महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.