गेल्या आठ वर्षांपासून प्रेम संबंध असलेल्या एका प्रेमीयुगलाने लग्नाआधीच एका बाळाला जन्म दिला. आणि त्यानंतर सदर युवतीने या नवजात बालकाला प्रियंकराकडे सोपवले. मात्र बापानेच मुलाची हत्या करून कचऱ्या पुंडी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बेळगावातील कीतुर तालुक्यातील अंबडगट्टी गावात घडली आहे.
बेळगाव मध्ये एका विचित्र प्रेमकथेत हे नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे. कित्तूर तालुक्यातील अंबाडगट्टी गावातील एकाच गल्लीत राहणाऱ्या महाबळेश कामाजी वय 31 आणि सिमरन माणिक बाई वय 22 यांचे गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. या प्रेमसंबंध दरम्यान या जोडप्यांमध्ये अनेक वेळा लैंगिक संबंध निर्माण झाले परिणामी सिमरन लग्न आधीच गर्भवती राहिली. मात्र अंगाने जाड असल्याने आपण गर्भवती असल्याचे सिमरनला माहित नव्हते. तिने वीस दिवसांपूर्वीच मोबाईवर व्हिडिओ पाहून बाथरूम मध्ये स्वतःची प्रसुती केली होती.त्यानंतर नवजात बाळाला तिच्या प्रियकराकडे सोपविले. यावेळी प्रियकरांनी मुलाला मारून कचऱ्याच्या कुंडीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र कचराकुंडीत मृत अवस्थेत आढळलेल्या नवजात बाळाची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी यासंबंधी माहितीच्या आधारे सिमरनची वैद्यकीय तपासणी केली असता सिमरन आणि महाबळेश्वर यांनी हे मूल आपलेच असल्याचे मान्य केले. पोलिसांनी आता नवजात बाळाच्या हत्ये प्रकरणी महाबळेश्वर आणि सिमरनला अटक केली आहे तसेच त्यांची रवानगी बेळगावातील हिंडलगा कारागृहात केली आहे.
प्रेम प्रकरणातून लग्नाआधीच जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या
